Monday, May 23, 2016

दिसामाजी काहीतरी ते ENTD करावे माझ्या ब्लॉग लिखाणाची शंभरी निमित्ताने

दिसामाजी काहीतरी ते ENTD करावे.
माझ्या ब्लॉग लिखाणाच्या शंभरी निमित्ताने :
ब्लॉग :http:///www.suhasdbokil.blogspot.com ...
स्थळ : पुण्याशिवाय दुसरं कुठलं हो !
काल:मार्च २०१४ पासून मे २०१६ पर्यंत
१ ते ७० लेख आधीच्या दोन यादीत आहेत.

७१. नवीन वर्षाच्या शुभेच्छा ...गुढीपाडवा २०१४
७२. श्रद्धांजली शतकवीर स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे,मुलुंड ठाणे
७३. वाढ दिवस कसला ? काढ दिवस
७४.....झालाच पाहिजे .महाराष्ट्रदिन.बलदंड महापुरुष आचार्य अत्रे (दुसरं कोण ?)
७५. घनश्याम सुंदर श्रीधरा ."वसंतमय "सुरेल सायंकाळ
७६ . आठवडी बाजार .रंगू बाजाराल जाते... जाऊ द्या
७७. एकसष्ठी ...माझ्या फोनाफोनीची
७८. "गेल्या दहा हजार वर्षात " ११६ वी अत्रे जयंती
७९. सस्नेह निमंत्रण आचार्य अत्रे साहित्यदर्शन पुणे फेस्टीव्हल गणेशोत्सव २०१४
८०. बोकीलांचे नवरात्र बोकीलवाडा कोरेगाव (सातारा )
८१. "अशी होती रे माझी आई " प्रेमळ इन्ना मावशी
८२. चाळीशी ...माझ्या सवाई स्वरयात्रेची (१९७४ ते २०१६)
८३. सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि माझी सरड्यापर्यंत....
(मामाच्या शेताला जाऊ या .....जाऊ या )
८४. स्मरण ...भारतरत्न स्वर् भास्कराचे पंडित भीमसेन जोशी जयंती
८५. मुक्काम पोस्ट सज्जनगड सातारा (जय जय रघुवीर समर्थ)
८६. तळजाईच्या पठारावर "आमचे हळदीकुंकू "
८७.सत्तर बेहत्तर (माझा सत्तरीत प्रवेश)
८८. अप्रकाशित आचार्य अत्रे (जुन्या सुंदर लेखांचे नवे पुस्तक )
८९.कै.राम गणेश गडकरी जयंतीनिमित्ताने,: शिष्याचे गुरुस्मरण :
९०.लागे मनी हुरहूर ....BMM २०१५ LA USA
९१."ती काळरात्र " पानशेत श्राद्धदिन १२ जुलै
९२. अर्ध शतकाची माझी वाटचाल :भारतीय स्टेट बँकेबरोबर (१९६४ ते २०१४ )
९३.महाराष्ट्राचा महापुरुष आचार्य अत्रे ११७ वी जयंती
९४.अत्रे उवाच "दार उघड बया दार उघड " महाराष्ट्रभूषण श्रीमंत बाबासाहेब
पुरंदरे
९५.माझी गरुडझेप ."गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स " हंसू आणि आंसू मिश्रीत
९६."प्रचंड "माणसाचे "प्रचंड "आत्मचरित्र "कऱ्हेचे पाणी " खंड ८
९७.८ नोव्हेंबर दिन विशेष .पु ल.जयंती आणि मित्रवर्य शिरूभाऊंचा स्मरणदिन
९८.एक स्मरण कै.यशवंतराव चव्हाण ;"प्रीतिसंगम "
९९.इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स --NATIONAL RECORDS 2016 ---
१००,मंतरलेल्या चैत्रबनातील एक संध्याकाळ --मंत्रमुग्ध करणारी
१०१.जागतिक महिला दिनानिमित्त "ती "ची आठवण स्मरण गीतकार कवी
साहिर लुधीयानवीचे
१०२.आमच्या गुरुवर्य श्री बापट सरांचे सहस्रचंद्रदर्शन नाबाद ८० अभिष्टचिंतन
१०३.वेळात वेळ काढून "वेळास " दर्शन कोकणातील मुशाफिरी
१०४. सत्तर बेहत्तर ....आभार ....धन्यवाद ....कृतज्ञता ..
१०५. "मानाचा फेटा " पुन्हा एकदा SSC च्या वर्गात
१०६ .शंभरी माझ्या ब्लॉगची
१०७. ते १०९ ."दिसामाजी काहीतरी ते ENTD करावे .
अशाप्रकारे माझ्या ब्लॉगची शताब्दी साजरी झाली ह्यानिमित्ताने सर्वाना माझे
धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा.
शुभप्रभात :दिनांक २४ मे २०१६ @@@@@@$$$$$$$$$$$@@@@@@@

Saturday, May 21, 2016

दिसामाजी काहीतरी ते ENTD करावे माझ्या ब्लॉग लिखाणाची शंभरी निमित्ताने

दिसामाजी काहीतरी ते ENTD करावे
माझ्या ब्लॉग लिखाणाच्या शंभरी निमित्ताने :
ब्लॉग http:///www.suhasdbokil.blogspot.com...
नोव्हेंबर २०१३ ते मार्च २०१४ USA CA(अनुक्रमणिका फक्त)
१ ते ४० लेख ह्याच्या आधीच्या यादीत आहेत.

४१. चंदेरी फुलबाज्या (चिंगी महिन्याची नाही झाली तोच ....)
४२. (क्रम बदललेला ) दिनक्रम आणि (कोलमडलेले ) वेळापत्रक
४३ . कॅलिफोर्निया आणि मेक्सिको
४४ . सफर एक दिवसाची (पूर्वार्ध)
४५ . सफर एक दिवसाची (उत्तरार्ध)
४६ . इचलकरंजी ---माझी कर्मभूमी
४७ .संगीत प्रेम आवड
४८. ब्रश - दाढेचा आणि दाढीचा
४९. अशी माणसे - तशी माणसे
५०. हजरजबाबी / समयसूचक इ.(अत्रे आणि पुलं)
५१..मंगल प्रभात (?) नव्हे नुसती प्रभात
५२.व्हेज कोल्हापुरी - अविस्मरणीय दशक
५३.कोल्हापूर --सांगली --कोल्हापूर (दैनंदिन सुहानी सफर )
५४. योगायोग ( महाशिवरात्र,जागतिक मराठीदिन आणि माझा मराठी ब्लॉग )
५५......म्हणे अगदी अत्रेच दिसताय !
५६. शुभारंभ ब्लॉगचा
५७. ब्लॉगची पहिली सलामी
५८ . प्रथम तुज पाहता....अमेरिके
५९. फौजदारांचे फलटण - माझे आजोळ
६० .गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या !
६१.गणपतीच्या गावात आणि "देवांच्या " देव आळीत (पेणेतील रम्य दिवस )
६२. नवी मुंबई मेरी जान (स्वेच्छा एकांतवासाची ७ वर्षे ) नेरूळ,सी,बी.डी.बेलापूर
६३. गुगल साम्राज्याला भेट - सर्वत्र गुगलच गुगल
६४. फेसबुकच्या पंढरीत
६५..बाजारहाट--हॉटेल्स --फूडप्लाझा -मॉल्स इ.इ.
६६. निरोप तुझा घेता .....अमेरिके....Good bye USA( गड्या रे आपुला गाव बरा )
६७.अत्रे उवाच ....सुधारित वचन ....."डी" ची करामत .हुडहुडी
ह्या नंतरचे ब्लॉग लिखाण आपल्या पुण्यानगरीतून केले आहे. धन्यवाद.
शुभप्रभात दिनांक २१ मे २०१६ >>>>>>>>>>>>#######>>>>>>>>>>>>>>>
See More

LikeShow more reactions
Comment

Wednesday, May 18, 2016

दिसामाजी काहीतरी ते ...ENTD मारावे. ब्लॉग लिखाणाच्या शंभरी निमित्ताने...

दिसामाजी काहीतरी ते ENTD करावे
माझ्या ब्लॉग लिखाणाच्या शंभरी निमित्ताने
BLOG:http:///www.suhasdbokil.blogspot.com...
नोव्हेंबर २०१३ ते मार्च २०१४ (अनुक्रमणिका फक्त )

१, मनोगत ..मनोरथा चल त्या नगरीला ...म्हणजे अमेरिकेला
2.मनोगत ..ठेविले अनंते तैसेची रहावे..पुणेरी मिश्रित अमेरिकेतील जीवन
3.मराठी काका धन्यवाद
४.मनोगत ..धन्यवाद ...आभार ....कृतज्ञता
5.विनम्र श्रद्धांजली .कै.सर्जेराव घोरपडे ( PRESTIGE प्रकाशन पुणे)
६."डे" ची करामत
7. सहजच सुचलं - बोकील (कोरेगाव जिल्हा सातारा)
८.मातृपितृ देवभव
९.वडिलार्जित वारसा (लाख मोलाची ठेव .अत्रे साहित्याची गोडी )
१०.क-हेचेच पाणी का ?
११. निरोप तुज देता ......२०१३
१२ .ये नवीन वर्षा ये ......२०१४
१३. अवघी दुमदुमली साहित्य पंढरी मु.पो.सासवड
१४ .अत्रे उवाच
१५. कट कट हेअरकट.. .. सुपरकट...
१६.थंडगार शुभेच्छा
१७ .दैनंदिनी (म्हणजे मराठीत डायरी )
१८ .'ते माझे घर'(अमेरिकेतील) म्हणजे मुलाचे घर
१९.Mr.San Fransisco (श्रीयुत सान फ्रान्सिस्को )
२०.अत्रे उवाच कवी पी.सावळाराम(गंगा यमुना .....)
२१ .बिनाका गीत माला आणि अमीन सायानी
२२. रिकामपण दे गा देवा
२३.बोकील म्हणजे ......अमक्याचे तमके कोण हो?
२४.Lawrence Express way (लॉंरेन्स एक्सप्रेस वे )
२५,सिटीबस (VTA)
२६.मामाच्या गावाला जाऊ या ......जाऊ या ...
२७ .आज मामाच्या घरीच जाऊ या. माझगाव मुंबई
२८ .आठवणी दाटतात
२९. शिरुभाऊ का हो इतकी घाई केलीत?(कै.श्रीधर सहस्रबुद्धे -अनावृत पत्र)
३०.EL CAMINO REAL HISTORIC ROAD CA USA
३१.चि.मीरा हर्षवर्धन बोकील (आमची नवीन माहेरवाशीण )
३२.ठणका आणि दणका ....दाढेचा
३३.खरीखुरी दंतकथा
३४.रविवारचा मोरावळा (कै.दत्तू बांदेकर)
३५.सनीवेल (खुर्द)
३६. सनीवेल( बुद्रुक)
३७.फेसबुकरावांचे अभिष्टचिंतन
३८.लग्नाची बेडी
३९.तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल (संगीत पंढरीतील विठ्ठलाचे स्मरण)
40 सुरेल सकाळ (.अरे वेड्या मना तळमळसी )
क्रमशः )वाचकमित्रा अरे प्रथम शीर्षक तर पहा.सविस्तर नंतर वाच.
शुभ प्रभात दिनांक १९ मे २०१६.......#############.............###########

Monday, May 16, 2016

शंभरी १०० री माझ्या ब्लॉगची

"शंभरी " १०० री माझ्या ब्लॉगची ........
फेसबुक मित्रानो वरील मथळा वाचून लगेच लक्षात येईल की माझी नाही पण माझ्या ब्लॉगलिखाणाची शंभरी आता भरली आहे. ह्या शंभरीतच मी "चाळीशी सवाई स्वर यात्रेची ", "एकसष्ठी माझ्या फोनाफोनीची " "SBI बरोबर माझी अर्धशतकाची वाटचाल " "सत्तर बेहत्तर " अशा 'अ 'गणित विषयावर मी थोडेफार लिखाण केलेले
अनेकांनी वाचले असेल किंवा नसेलही.बँकेच्या नोकरीमुळे "डे बुके" लिहिण्याचीच
सवय होती पण एखादे "बुक "लिहिण्यापर्यंत आपली मजल जाईल असे मात्र मला
कधीच वाटले नव्हते.पण हा योग २०१३ /२०१४ मध्ये मी अमेरिकेत असताना तेथील हवामान आणि वातावरणामुळे आला.तेथील कडाक्याच्या थंडीमुळे सायंकाळी मी घरी सातच्याच नव्हे तर चारच्या आतच घरी परतत असे. पुढे काय करायचे? तेंव्हा श्री समर्थ रामदासांचे "दिसामाजी काहीतरी ते लिहावे /प्रसंगी अखंडित वाचीत जावे " हे सारखे आठवत असे.आजकालच्या जमान्यात "दिसामाजी काहीतरी ते लिहावे
च्या ऐवजी " दिसामाजी काहीतरी ते ENTD मारीत जावे " हेच अधिक योग्य वाटले.
मराठीतील साहित्यिक लिखाणाची मजा इंग्रजीत (मला तरी) सहजासहजी जमली
नसती म्हणून मी पुण्याला मराठीकाका श्री अनिल गोरे ह्यांच्याशी संपर्क साधला आणि मराठी फोन्ट(font) व संबंधीत बरच काही माहिती करून घेतले आणि ब्लॉगची bating सुरु केली.ब्लॉगचे बारसे पण "दिसामाजी काहीतरी ते :"
असेच केले. मला आठवतंय त्या दिवशी जागतिक मराठी दिन आणि कविवर्य कुसुमाग्रजांचा वाढदिवस होता.दुपारी भोजनोत्तर रोज नवीन विषय डोक्यात वळवळायला लागे.पण संदर्भासाठी पुस्तके,वर्तमानपत्रे,जुनी डायरी काहीच उपलब्ध नसे. संगणकासमोर बसलो की कर्ता.कर्म आणि क्रियापद ही मंडळी हात जोडून
माझ्या पुढ्यात येत आणि मग डोक्यात अनेक रिळे उलगडायला सुरवात होई.
भराभर 3/४ परिच्छेद लिहून/मारून व्हायचे.मला सांगायला आनंद होतो की
आजपर्यंत विविध विषयावरील जवळजवळ ११० /११५ ब्लॉग्स मी लिहू शकलो.
कोणत्याही एकाच विषयात फारसे गुंतून न राहता चौफेर गोलंदाजी केली.ह्यात काय नव्हते? साहित्य, संगीत,प्रवास,नातेवाईक,नोकरीनिमित्त झालेली त्रिस्थळी यात्रा,
माझे गाव,आईवडील,आजोळ ,मामामामी,बोकिलांच्या घरातील नवीन माहेरवाशीण
अत्रे पु ल भीमसेनजी अमेरिकेतील जीवन ,तेथील लोक,राहणीमान,वाहतूक,Mr.सान्फ्रान्सिस्को इ.इ.प्रत्येक ब्लॉगला "शीर्षक" मात्र खास आत्रेय शैलीतले दिले.सर्व लेखांची एक स्वतंत्र यादीच मी देणार आहे.लेखाचा मथळा वाचून वाचकाला त्यात डोकावण्याची इच्छा व्हावी म्हणून मी नेहमी प्रयत्नशील असतो.
माझ्या अनेक फेस् बुक मित्रांनी मला फोन करून,like, comments प्रतिक्रिया,sharingद्वारे मला प्रोत्साहन दिले. मी काही हाडाचा लेखक नसल्याने
काही उणीवा,त्रुटी झाल्या असतीलहि.पण केलेला प्रयत्न आणि झालेला आनंद
ह्यामुळे त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही.
आता आणखी एक नवीन ब्लॉग सुरु करायचा मी विचार करतोय.कारण " दिसामाजी ....."मध्ये चार पाच परिच्छेद होतात.सर्वाना वेळ आणि आवड पाहिजे.
म्हणून एकदा किस्सा ,एकादी आठवण,विनोद,फिरक्या कमी वेळेत आणि जागेत
बसतील अशासाठी हा नूतन ब्लॉग उपयोगी पडेल.जन्मापूर्वीच मी ह्या ब्लॉगचे बारसे
"हलकं-फुलकं " असे केले आहे. सहा सात आठवणी विनोद ह्यापूर्वीच ब्लॉगवर नोंदले गेले आहेत. अनेक मित्रांनी, वाचकांनी "दिसामाजी ...."पुस्तकरूपाने प्रसिद्ध करा म्हणून लटका आग्रह धरला आहे.बघू या.कसा काय "व्यवहार "असतो तो.
कारण मी ह्या विषयात अगदीच "हा " आहे.ह्या निमित्ताने सर्व फेसबुक मित्रांचे,
वाचकांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार ......धन्यवाद ......
शुभप्रभात दिनांक १७ मे २०१६.......&&&&&&&&&&&...........&&&&&&&&&....
LikeShow more reactions
Comment

Tuesday, May 3, 2016

मानाचा फेटा : पुन्हा एकदा SSC च्या वर्गात

मानाचा फेटा --पुन्हा एकदा SSC च्या वर्गात :-
काल माझा संपूर्ण दिवस १९६३ सालच्या SSC वर्ग मित्र आणि हो मैत्रिणीसुद्धा ह्यांच्या सानिध्यात गेला.पुण्यात असूनही मनाने सगळेजण "कुलाब्याचे पुणे "म्हणून
एकेकाळी ओळखले जाणा-या पेण शहरात होते. पेण म्हटलं की डोळ्यासमोर गणपती,पोहे,वाल,मिरगुंड . पोह्याचे पापड ,अशी यादीच उलगडली जाते. अशा गावात माझ्या ७० वर्षाच्या आयुष्यातील पुरी ४ वर्षे गेली आहेत."रम्य ते बालपण " किंवा "बालपणीचा काळ सुखाचा " म्हटले की माझ्या डोळ्यासमोर अजूनही पेणचा
चावडी ते रामवाडी हा रस्ता,मिरची गल्ली आणि अनेक "आळ्या",पीर डोंगरी आणि
आणि डोंगरी खालची आमची शाळा डोळ्यासमोर येते.फारच मस्त काळ होता तो. अर्थशून्य वाटणारा पणआनंदाच्या डोहात डुंबायला लावणारा. मार्च २०१३ मध्ये आम्ही १९६३ SSC batch चा स्नेह मेळावा आयोजित केला होता.७० ते ८० जण जमले होते. जाताना "पुन्हा भेटू या "असे म्हणत सर्वजण पांगले.पण नंतर 3 वर्षात "असा " योग येत नव्हता.कारण अनेकांची अवस्था "संध्याछाया भिवविती हृदया" अशी होऊ लागली.म्हणून पुणे आणि आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांनी
काही काळ तरी एकत्र जमण्याचे ठरविले .हा योग काल (2 मे २०१६) ला आला.
सर्वश्री किशोर जोशी, विलास फडके,अनंत जोशी आणि अस्मादिक तर महिला आघाडीत" सर्वसौ " सुमन साठे,वीणा शृंगारपुरे,नीला रिसबूड आणि
आशा भागवत (हजेरी पत्रकाप्रमाणे)हजर होते. त्याच बरोबर डॉक्टर कुलकर्णी
हे यजमान म्हणून सर्वांचे आदरातिथ्य मोठ्या हौसेने करत होते. डॉक्टर कुलकर्णी हे दौंडचे नगराध्यक्ष होते हे आम्हाला त्याचवेळी समजले.आम्ही सर्वजण दुपारी १२
वाजताच "वर्गात " शिरलो. डॉक्टर सुमन कुलकर्णी-साठे हिने प्रथम सर्वांना थंडगार पन्हे पाजून थंड केले आणि २ पर्यंत वेळ घालविण्यासाठी ५/६ बशा भरून "नैवेद्य "
म्हणून आमच्यासमोर ठेवल्या.पण खाण्यापेक्षा बोलण्याकडेच प्रत्येकाचे लक्ष होते.तसे अनेकजण फेस बुक / whats app ह्या मार्गाने रोज एकमेकांना भेटतातच.पण
त्यात काही "जान" नसतो म्हणून "किती किती सांगू तुला "अशी अवस्था सर्वांची झाली. पेणच्या,शाळेच्या ,अनेक सरांच्या,विद्यार्थी विद्यार्थिनींच्या,आठवणी निघाल्या.
काही संस्मरणीय प्रसंगांचीही उजळणी झाली.चेष्टा मस्करी, हास्यविनोद ह्याला कसलेबंधन नव्हते.पण घड्याळाच्या काट्याचे सर्वांनाच बंधन असल्याने मध्यंतर म्हणून
मुद्पाकखान्याकडे सर्वांनी मोर्चा वळविला.पण यजमानांची वेगळीच गडबड सुरु झाली.त्यांनी शाल,श्रीफल,फेटा,आकर्षक पुष्पगुच्छ,भेटवस्तू आणल्या. पण हे सगळं
कोणासाठी होतं हे कळेना. नंतर समजले नुकताच 70 वा वाढदिवस,लिम्का बुक
ऑफ रेकॉर्ड्स,आणि आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधील विक्रमाबद्दल हे माझ्या साठीच होतं.मी संकोचलो होतो. नव्हे हे सर्व प्रेमाचे भरते आलेले पाहून अक्षरशः
गुदमरलो. खांद्यावर डॉक्टरांनी शाल पांघरली आणि मानाचा फेटा दिला.बाप रे ! फेटा घेऊन हा आयुष्यातील पहिलाच सत्कार झाला. धडाधड मोबाईल कॅमेरातून
फोटो निघाले.मिठाई देऊन सर्वांची तोंडे गोड केली.आणि मग टेबलावरील सर्व
पदार्थांना योग्यतो न्याय न संकोचता सर्वांनी दिला.सर्वच भोजन रुचकर होते."अन्नदाता सुखी भव"म्हणत सर्वांनी मुखशुद्धी केली. उरलेल्या गप्पा पुन्हा वेग
घेऊ लागल्या पण घड्याळहि वेगात चालले होते. शेवटी गेटपर्यंत जाऊनसुद्धा गप्पा
थांबता थांबेनात.बाहेर कडक उन्ह होते.पण "गुड बाय "म्हणत सर्वांनी निरोप घेतला.
(एकदाचा)
माझ्या डोक्यावर नाही पण डोक्यात फेटा शिरला होता. आज पर्यंत मी अनेक प्रकारच्या टोप्या स्वता:च्या स्वतः घेतल्या आणि घातल्या तर काही इतरांनी मला
"घातल्या".पण फेटा मात्र आजच मिळाला.तो सुद्धा विकत न घेता .! पण मानाचा !
सर्व कार्यक्रम व्यवस्थित,आदराने,प्रेमाने आयोजित केल्याबद्दल डॉक्टर दाम्पत्याचे
आभार मानावेत तेवढे कमीच आहेत .
शुभप्रभात दिनांक ४ मे २०१६ ................@@@@@@@..........##########

Saturday, April 30, 2016

सत्तर बेहत्तर ....आभार ....धन्यवाद .....कृतज्ञता

सत्तर बेहत्तर ......आभार,धन्यवाद,कृतज्ञता
नेमेची येतो मग पावसाळा ह्या उक्तीप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याची ...
३० तारीख उजाडली.खरतर हा दिवसही नेहमीप्रमाणे २४ तासांचाच होता.तसं फार काही विशेष आजच्या तारखेला घडलं नाही.फक्त ३० एप्रिल १९४६ साली मी
फलटण संस्थानात ह्या भूतलावर प्रगट झालो इतकंच.म्हणजे आज माझा वाढदिवस,
झाली ७० वर्षे पूर्ण जीवनाला.त्यामुळे आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे "आता कसला वाढदिवस आता काढदिवस" तरीपण सत्तर बेहत्तर वर्षे झाली महाराजा !

आज सकाळपासूनच फोनाफोनी सुरु झाली होती.दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी ह्यांची
जुगलबंदी सुरु होती.whats app आणि फेसबुक ह्या माध्यमातूनही शुभेच्छांचा मारा सुरु होता.त्याचवेळी "हेची फल काय मम तपाला " हा विचार डोक्यात येत होता.
सर्व सामान्य माणसाला आणखी काय हवय ?जगात कोणतरी आपली आठवण काढतंय ही कल्पना,हा विचारच सुखावह असतो. खरतर आज ह्या सर्व मंडळीना
व्यक्तिशः भेटून आभार मानावेत असा मला वाटतंय पण प्रत्यक्षात हे अवघड वाटते.म्हणूनच फेस् बुकच्या माध्यमातून मी सर्वांचे जाहीररीत्या आभार मानतोय.सर्वाना मनापासून धन्यवाद देतोय.माझे आप्त,शाळेतील वर्ग मित्र परिवार,बँकेतील अनेक सहकारी,निवृत्तीनंतर मित्र झालेले अनेक ज्येष्ठ नागरिक,विविध कट्ट्यावरची विविध मंडळी ,सोसायटीतील शेजारीपाजारी अशी कितीतरी मंडळी आभार मानायला हवेतच अशी आहेत म्हणून हा प्रपंच मांडलाय.
आज फेस बुकच्या मेमरीत मी ३० एप्रिल २०१४ मध्ये "दिसामाजी काहीतरी ते "ह्या ब्लोग मध्ये लिहिलेला लेख पुन्हा अनेकांना वाचायला मिळाला.त्या बद्दलही like आणि comments आल्या आहेत.म्हणून नवीन अधिक काही वाचण्याचा त्रास मी कुणाला देऊ इच्छित नाही.एका मित्राने तर हापूसच्या रसरशीत शुभेच्छा ओरपायला
पाठवल्या आहेत. तर कलाकार मित्राने माझा मूळ फोटो तसाच ठेऊन मला कुंचल्यातून अधिक देखणे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.सक्काळी सक्काळीच आमच्या प्रभात भ्रमण मंडळाने नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा केला.
चमचमीत बटाटेवडे,कांदेपोहे पोटात व्यवस्थित बसवले.बुके फोटो वगैरे झालेच.
एकूण काय आजचाही दिवस नेहमीप्रमाणे आनंदात गेला नव्हे घालविला.
पुन्हा एकदा सर्वांचे मन:पूर्वक आभार ....आभार .....आभार !!
शुभप्रभात दिनांक १ मे २०१६ @@@@@@@@@@@@@@@@@@@

Monday, April 4, 2016

वेळात वेळ काढून "वेळास " दर्शन ......कोकणातील मुशाफिरी

वेळात वेळ काढून "वेळास"दर्शन ...
कोकणातील मुशाफिरी !
कोकण आणि कॅलिफोर्निया हे दोन शब्द फारच गुळगुळीत झालेले आहेत.मध्यंतरी तर ह्या शब्दांचा वापर सारखा होत असे.कॅलिफोर्निया म्हणजे काय भानगड असते हे पहाण्यासाठी अनेकजण कोकणाचा दौरा मुद्दाम आयोजित करतात आणि तेथील सृष्टीसौंदर्य,हिरवीगार वनश्री,अथांग सागर दर्शन आणि भरपेट मत्स्याहार करत खर्या कॅलिफोर्नियाला जाणे लगेच रद्द करतात.थोडक्यात प्रत्येकजण आपल्या कोकणच्या प्रेमात पडल्यावाचून रहात नाही.मीपण ह्याला अपवाद नाही.
चारपाच वेळा तरी माझे कोकण दर्शन झाले आहे.फक्त मासे न खाता नुसते मासे
पाहूनच येण्याचा गुन्हा मी केला आहे. नमनाला घडाभर तेल घालून आता आम्ही
नुकताच वेळात वेळ काढून कोकणातल्याच हरिहरेश्वर,वेळास ह्या गावांचा दौरा केला त्या विषयीच्या हिरव्यागार आठवणी थोडक्यात सांगतो.
2 आणि 3 फेब्रुवारीला आम्ही म्हणजे SBI ची निवृत्त हौशी मंडळी कोकण दर्शनास
निघालो.आमच्या स्पेशल बसमध्ये प्रामुख्याने सोलापुरचीच "पांच मेहुण" आणि आम्ही दोघेजण "असेच " एकूण एक डझन प्रवासी होतो. सगळेच सत्तरीच्या आसपास होते.भल्या पहाटे उठून सकाळी सात आठच्या सुमारास "सीटा" गोळा
करत करत आम्ही पुणे सोडले.गाडीत गप्पांचा फड जमला."आमच्या वेळी ......."हे ध्रुव पद सर्वांचेच होते. अनेकांच्या अनेक आठवणी ऐकत असतानाच ताम्हिणी
घाटाजवळील एका देखण्या सुशोभित उपहारगृहाजवळ बस सकाळच्या पोटपुजेसाठी थांबली. गरमागरम आणि रुचकर पदार्थ.मग काय विचारता ? हे सारे काही देखणेपण बिल देताना चांगलेच जाणवले.घाटातील प्रवास,बाहेरील वनश्री,आणि बसमधील जुनी हिंदी गाणी ऐकत आणि अनुभवत सर्वजण "त्या " काळात गेले होते. "खाली "उतरल्यावर निजामपूर,माणगाव मागे टाकून आता आम्ही
हरीहरेश्वरच्या पुरातन मंदिराजवळ आलो होतो.भगवान श्री शंकर,गजाननाचे आणि काळभैरवाचे दर्शन घेऊन समोरच असलेल्या अथांग सागराचे दर्शन आम्ही घेतले.
"घाटावर" ही मजा कुठली हो?वेळेचे बंधन असल्याने लगेच जेट्टीवर जाऊन पल्याड नेऊन सोडणारी छोटी बोट पकडली.फेसाळलेल्या पाण्याच्या लाटा कापत कापत पैलतीरावर पोहोचलो आणि लगेच सागराच्या काठा काठाने नागमोडी रस्त्याने हिरव्यागार झाडीतून एका कोकणी वाडीजवळ/गावाजवळ आमची बस थांबली.हेच ते "वेळास" गाव आले होते.अहाहा ! आम्ही कुठे आहोत हेच कळत नव्हते. फारच सुंदर रमणीय. तोपर्यंत दुपारचे अडीच वाजले होते.सर्वांच्याच पोटातील कावळे आता एका कोरस मध्ये ओरडत होते म्हणून लगेच पूर्वनियोजित "अन्नपूर्णा "गृहात भोजनासाठी गेलो.चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे काय हे अनुभवले.
फारच रुचकर भोजनाने यज्ञ कर्म चांगलेच पार पडले. तेथेच अनेकांनी कोकणी
मेवा वस्तू खरेदी केल्या.भोजनोत्तर शेजारच्याच कोकणी पद्धतीच्या घरातील जुन्या काळातील संसार कसा असायचा हे प्रदर्शन पाहिले.काळाआड गेलेल्या अनेक वस्तू
पाहून भूतकाळात रमलो. फिरकीचा प्रवाशी तांब्या,महिला वर्गाचा नट्टापट्टा करणारा
लाकडी पेटीतला" तो "आरसा,जाते,उखळ,लाकडी पाळणा,मुसळ इ.इ.
आमच्याच एका प्रवासी मित्राच्या कन्यांनी आणि जावयांनी वेळास येथेच समुद्राकाठी
सर्व सुखसोयींनीयुक्त असा बंगला बांधला असल्याने आमचे सर्व व-हाड मुक्कामाला
तेथेच गेले.जणू काही आपण पुण्यातीलच घरात आहोत असे सर्वांना वाटावे इतका
सुंदर बंगला आहे हा.! विश्रांतीनंतर सायंकाळी आम्ही शासकीय कासव संस्थेत
कासवाच्या दर्शनाला गेलो खरे पण पुण्याहून काही मंडळी आपल्याला "बघायला" येणार असल्याचे कळताच सर्व कासवानी आपली पारंपारिक " कासवगती " विसरून हरिणाच्या गतीने समुद्राकडे धाव घेतली. समुद्रावरून परतताना वेळासचे ग्रामदैवत श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले.नंतर आमचा मनोरंजनाचा विविध गुणदर्शन
हा छोटा कार्यक्रम झाला.मजा आली. विशेष म्हणजे बसचा ड्रायव्हरहि भेंड्या
लावण्यात सहभागी होता. रात्री पुन्हा अन्नपूर्णागृहात खास कोकणी पद्धतीचे भोजन
होते.तांदुळाची भाकरी,फणसाची भाजी आणि पिठलं ......हे देखणेपण भावले.
दुस-या दिवशी सुप्रभाती पुन्हा कासवांच्या दर्शनाला गेलो असताना पुन्हा कालचाच प्रयोग झाला म्हणून सर्वजण समुद्रकिना-यावर फिरायला गेलो प्रभात समयीची
शोभा,थंडगार वात सुटत, हे अनुभवत,लाटांचा तो घनगंभीर आवाज,फेसाळलेले
पाणी,वाळूतून जाताना "पायाखालची वाळू सरकणे "ह्या म्हणीचा अनुभव.घाटी
माणसाला हे सगळे अप्रूपच होते.घड्याळाचे काटे पुढे सरकतच होते.कोकणी घरगुती कांडलेले गरम कांदेपोहे हा नाश्ता करून आम्ही मागच्या वाडीत गेलो.
वाडीत म्हणजे बागेत. आंबा नारळ काजू फणस अनेक फुलझाडे,पालेभाज्या आणि रहाटअसलेली विहीर होती.अनेकांनी वेळासच्या अनेक ठिकाणच्या आठवणी
कॅमेरात कैद केल्या. वेळास चा निरोप घेऊन आणि सुखद आठवणी उराशी
बाळगून आम्ही मंडणगड,दापोली ,खेड मार्गे श्री परशुराम क्षेत्र ह्या ठिकाणी आलो
परशुरामाचे दर्शन घेऊन सायंकाळी आम्ही पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.
आपला स्नेहांकित का मत्स्यांकित म्हणू ?
शुभप्रभात दिनांक 5 एप्रिल 2016